Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलिस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : पोलिस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत वर्षात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिस हुतात्

तलवार घेऊन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; पाहा व्हिडीओ l LOK News 24
युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज
जिंदाल कंपनी आग प्रकरणी ७ जणांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : पोलिस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत वर्षात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनीही पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. सुरुवातीला राज्यपालांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेले 39 पोलीस अधिकारी व 177 पोलीस अमलदारांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. यावेळी गणवेशधारी अधिकारी व जवानांनी सलामी दिली तसेच पोलिसांतर्फे अभिवादन रूपात बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या. राज्यपालांनी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

COMMENTS