Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनी सरकारी सुट्टी जाहीर

केवळ मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी

मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी प्रशासनाने पत्रक काढून सुट्टी जाहीर केली आहे. 6 डिसेंबर

निफाड नगरपंचायत चा आडमुठेपणा, करवाढीच्या मुद्द्यावर उपोषणकर्ते ठाम
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
कटरीनाला सासूबाईंची विशेष काळजी

मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी प्रशासनाने पत्रक काढून सुट्टी जाहीर केली आहे. 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार्‍या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी मागणी केली होती. आता या मागणीला यश आले आहे. प्रशासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुट्टी लागू केली, अशी माहिती मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
सरकारने परिपत्रक काढून म्हटले आहे की, 18 सप्टेंबर 1996 अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी दिवशी व 2007 पासून गोपाळकाळा (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्स सरकारी व निमसरकारी कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी देण्यात येत आहेत. 6 डिसेंबर या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणे शक्य व्हावे, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारे पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. आता सततच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.

COMMENTS