अश्‍लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणारे गोत्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अश्‍लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणारे गोत्यात

अहमदनगर/प्रतिनिधी : अश्‍लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणारे गोत्यात आले असून व्हिडीओ व्हायरल प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.य

*18+ साठी लस नोंदणी: नोंदणी केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती | पहा Lok News24*
निमगाव वाघात विद्यार्थ्यांनी लावले एक पेड माँ के नाम
विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे

अहमदनगर/प्रतिनिधी : अश्‍लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणारे गोत्यात आले असून व्हिडीओ व्हायरल प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, नुकतेच चार डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून एका राजकीय नेता असलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या तक्रारीत अत्याचारित विवाहितेने आरोपीचा अत्याचार करतेवेळीचा व्हिडीओ चित्रित झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर संबंधित अत्याचार करणार्‍या आरोपीचा एक अश्‍लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ ज्या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपला व्हायरल केला आहे, त्या संदर्भात दोन मोबाईल क्रमांकधारकांवर आता सुंदर खंडू मोकाटे यांनी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एमआयडीसी पोलिसांनी भा.द.वि. कलम 500, 502 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत अश्‍लील पॉर्न व्हिडीओ व्हायरल करणार्‍या संबंधितांचे मोबाईल नंबर तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपचे नाव देण्यात आले आहे. तक्रार देणारे मोकाटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपल्या भावाचे एका महिलेसोबतचे बनावट अश्‍लील पॉर्न व्हिडीओ इमामपूर परिसरात व्हायरल केले जात असून त्याद्वारे कुटुंबाची प्रतिमा मलिन केली जात आहे व राजकीय आणि सामाजिक प्रतिमा हनन करण्याचे काम केले जात असल्याचे म्हटले आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत.

COMMENTS