कल्याण प्रतिनिधी - अमेरिके वरून आलेल्या अनघा फाल्गुने यांनी डोंबिवलीतील फडके रोडवरून एमआयडीसीच्या दिशेने जाणारी रिक्षा पकडली. यावेळी रिक्षातू

कल्याण प्रतिनिधी – अमेरिके वरून आलेल्या अनघा फाल्गुने यांनी डोंबिवलीतील फडके रोडवरून एमआयडीसीच्या दिशेने जाणारी रिक्षा पकडली. यावेळी रिक्षातून उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल हा रिक्षातच राहिला. यासंदर्भात त्यांनी तात्काळ डोंबिवली पोलीस ठाणे गाठत या संदर्भातील माहिती पोलीसांना दिली. पोलिस हवालदार विशाल वाघ आणि कॉन्स्टेबल नितीन सांगळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार क्षणाचाही विलंब न कारता तात्काळ रिक्षाचा शोध सुरू करत अनघा फाल्गुने यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल अवघ्या १० मिनिटात शोधून काढत तक्रारदार यांना परत मिळवून दिला. यावेळी अमेरिके वरून आलेल्या अनघा फाल्गुने यांनी पोलिसांचे आभार मानले.
COMMENTS