Homeताज्या बातम्यादेश

नीरज चोप्राची पुन्हा सुवर्ण कामगिरी

87.66 मीटर अंतरावर भालाफेक करत मिळवलं पहिलं स्थान

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेच. याच नीरज चोप्राने देशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे

खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद – नीरज चोप्रा
नीरज चोप्राने घेतला रौप्यपदकाचा वेध
नीरज चोप्राने रचला इतिहास

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहेच. याच नीरज चोप्राने देशाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेक करत त्याने हे स्थान मिळवलं. सिझनमधला हा त्याचा दुसरा विजय आहे. याआधी दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटर भालाफेक करत नीरजने पहिलं स्थान मिळवलं होतं. नीरज चोप्राने ५ मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर आता लॉसने डायमंड लीगमध्ये त्याने पहिलं स्थान पटकावलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एफबीके गेम्स आणि पावो नूरमी गेम्स या दोन्ही स्पर्धांमधून नीरज चोप्राने दुखापत झाल्यामुळे माघार घेतली होती. नीरज चोप्राने या लीगच्या पाचव्या फेरीत ८७.६६ मीटर अंतरावर भाला फेकला आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या फेरीत त्याने फाऊलने सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर ८३.५२ मीटर आणि ८५.०४ मीटरवर त्याने भाला फेकला. चौथ्या फेरीत नीरजकडून आणखी एक फाऊल झाला. पण पुढच्या म्हणजे पाचव्या फेरीत ८७.६६ मीटर अंतरावर नीरजने भाला फेकला. त्याची बरोबरी कुणीही करु शकलं नाही. त्यामुळे नीरजने डायमंड लीग पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे

COMMENTS