बीड प्रतिनिधी - अजित पवार गटात सद्या जोरात इनकमिंग सुरू असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या अनेक शिलेदारांनी प्रवेश केल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाक

बीड प्रतिनिधी – अजित पवार गटात सद्या जोरात इनकमिंग सुरू असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या अनेक शिलेदारांनी प्रवेश केल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाही भगदाड पडणार आहे.शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जय भगवान संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि गोल्डन मॅन अशी ओळख असलेले उद्योगपती बप्पासाहेब घुगे हे दि.27 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
बप्पासाहेब घुगे हे हेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करत आहेत. शिवसेनेत अनेक पदावर त्यांनी काम केले असून मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. घुगे हे कसलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात आलेले आहेत. राजकारणासोबत ते समाजकारणात देखील आपले योगदान देत आहेत. राजकारणासह त्यांनी उद्योग व्यवसायाकडे देखील चांगले लक्ष दिलेले असून त्यांनी अनेक चुली पेटवण्याचे काम केलं आहे. बेरोजगारांच्या हाताला काम देऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे. शिवसेनेत त्यांचे जिल्हाप्रमुख पदासाठी नाव चर्चेत आले होते. दरम्यान, त्यांच्यावर आज शिवसेनेची जिल्हा समन्वयक ही जबाबदारी आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीड मतदार संघातून अजित पवार गटात येणार्या नेत्यांचा ओढा वाढलेला दिसत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड मतदारसंघात अधिकचे लक्ष घातलेले असून पहिल्या टप्प्यात त्यांनी आ.संदीप क्षीरसागर यांचा गट फोडून अनेक शिलेदार आपल्या सोबतीला घेतले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बबनराव गवते यांच्या माध्यमातून संदीप क्षीरसागर यांचा गट फोडण्यात मोठे यश आलेले आहे. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट फोडण्यास सुरुवात केली असून बाप्पासाहेब घुगे हे दि.27 रोजी प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसणार आहे.
COMMENTS