Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीड कोटींचे बनावट हॉलमार्क असलेले सोने जप्त

मुंबई : भारतीय मानक ब्युरोने याच्या दागिन्यांवरील बीआयएस हॉलमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी म

सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन
स्मशानभूमीतील वाल्मीक तीर्थ ठरतंय आकर्षण
पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे

मुंबई : भारतीय मानक ब्युरोने याच्या दागिन्यांवरील बीआयएस हॉलमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणार्‍या दोन आस्थापनांवर छापे टाकून कारवाई केली, त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

ठाणे, पुणे आणि नागपूर येथेही अशीच कारवाई करण्यात आली, त्यात बनावट चिन्हांकित दागिने जप्त करण्यात आले तसेच बीआयएसने निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मेसर्स श्रीशंकेश्‍वर सेइंग अँड टंच, झवेरी बाजार, मुंबई, मे. जय वैष्णव हॉलमार्किंग सेंटर, झवेरी बाजार, मुंबई, मे. विशाल हॉलमार्किंग सेंटर, जांभळी नाका, ठाणे,मेसर्स श्रीशंकेश्‍वर सेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, अंधेरी, मुंबई, मे. जोगेश्‍वरी सेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर, रविवार पेठ, पुणे आणि मे.रिद्धी सिद्धी हॉलमार्क, इतवारी, नागपूर या ठिकाणी देखील छापा टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली.

COMMENTS