Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनुष्का शिंदेला सुवर्ण तर संपदा नाळेला कांस्यपदक

विभागीय तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगरच्या कन्यांची चमकदार कामगिरी

अहमदनगर/प्रतिनिधी ः पनवेल येथील विभागीय तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगरच्या कन्यांनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. केंद्रीय विद्यालय

प्रवरेच्या कृषीदुतांचे पिंपळवाडीत स्वागत
संजयनगरचा कत्तलखाना आरोग्यास धोकादायक- नगराध्यक्ष वाहडणे
Ahmednagar : नगरमध्ये खळबळ: बड्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः पनवेल येथील विभागीय तायक्वांदो स्पर्धेत अहमदनगरच्या कन्यांनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. केंद्रीय विद्यालय अंतर्गत 18 आणि 19 ऑगस्ट दरम्यान पनवेल येथे विभागीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटात 35 ते 38 किलो वजन गटात अनुष्का सुशांत शिंदे हिने सुवर्णपदक मिळवले व संपदा नाळे 41 किलोवरील वजन गटात कांस्यपदक मिळवले. त्यांच्या या यशाचे अहमदनगर जिल्ह्यात कौतुक होत असून, या यशाबद्दल खेळाडूंचे एकलव्य अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपदादा सातपुते व नगरसेवक विजय पठारे यांनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अल्ताफ खान, गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, तेजस ढोबळे, मंगेश आहेत, सचिन मरकड, सचिन कोतकर, ऐश्‍वर्या वाघ, प्रिती राय यांचे मार्गदर्शन लाभले. अनुष्का सुशांत शिंदेची पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अनुष्का ही सावली नर्सिंग कॉलेज टाकळी ढोकेश्‍वर येथील प्राचार्य सुशांत भानुदास शिंदे यांची मुलगी असून अनुष्काचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS