जामखेड : जामखेड बस स्थानकातील गैरसोयींचा फटका सातत्याने प्रवाशांना बसत आहे. ११ मे रोजी पून्हा एकदा महीला प्रवासी एस टी बस मध्ये चढताना गर्दीचा फा
जामखेड : जामखेड बस स्थानकातील गैरसोयींचा फटका सातत्याने प्रवाशांना बसत आहे. ११ मे रोजी पून्हा एकदा महीला प्रवासी एस टी बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत पर्स मधिल सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले विशेष म्हणजे बस स्थानक परिसरात मागणी करुन देखील सीसीटीव्ही कॅमेरे बस स्थानकात बसवले नसल्याने चोरांचा तपास करण्यास पोलिसांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी फीर्यादी प्रवाशी महीला सोनाली गणेश जगताप मुळ रा. टाकळसिंग ता. आष्टी हल्ली रा. बोरगाव ता. करमाळा या आपल्या टाकळसिंग या मुळ गावावरून करमाळा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी काल दि ११ मे रोजी दुपारी निघाल्या होत्या. त्या दुपारी पावणे दोन वाजता जामखेड एस टी बस स्थानकात आल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या अंगावरील दागिने हे पर्स मधिल पाकीटात ठेवले होते. यानंतर करमाळा एस टी बस आल्यावर त्या बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने महीलेच्या पर्स ची चैन उघडून पर्स मधिल गळ्यातील ठुशी, कानातील झुंबर, कानातील वेल, कर्णफुले व मणिमंगळसुत्र आसे एकुण ८४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. यानंतर फीर्यादी प्रवासी महीला या आपल्या बसच्या सीटवर बसल्या नंतर त्यांना पर्स ची चैन उघडी दिसली व त्यांनी पर्स मध्ये पाहीले असता आपले सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे लक्षात आले. यानंतर फीर्यादी सोनाली जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
बस स्थानकात चोर्यांचे प्रमाण वाढले
जामखेड एस टी बस स्थानकाच्या नवीन एस टी बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. जुन्या बस स्थानकात कसलाही निवारा नसल्याने सध्या प्रवासी उघड्यावर बस ची वाट बघत बसतात. आनेक वेळा छेडछाडीच्या व चोरीच्या घटना या बस स्थानकात घडत आहेत. आनेक वेळा नागरीक व प्रवाशांनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी केली आहे मात्र याकडे संबंधित एस टी अगार विभाग कानाडोळा करीत आहेत. त्यामुळेच अज्ञात चोरटे गर्दीचा फायदा घेत महीलांच्या बॅग मधिल दागिने चोरीत आहेत. आतातरी एसटी अगार विभागाने याठिकाणी सीसीटीव्हीत कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
COMMENTS