Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर महाविद्यालयातील मीनल शेलार, श्रुती सराफ यांना सुवर्णपदक

बेलापूर ः बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष शाखेचे विद्यार्थीनी मीनल राजेंद्र शेलार, श्रुती विकास सराफ यांना सावित्रीबाई फु

मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

बेलापूर ः बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष शाखेचे विद्यार्थीनी मीनल राजेंद्र शेलार, श्रुती विकास सराफ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेतील एप्रिल मे 2022 या शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षेत  अ‍ॅव्हान्स्ड अकाउंटन्सी विषयाचे  सुवर्णपदक मिळाले आहे. प्रत्येकी कै. मधुसूदन अच्युत केळकर स्मृती सुवर्णपदक आणि एस.बी झावरे सुवर्णपदक दोघींनीही प्राप्त केले आहे. बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके, उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, सचिव अ‍ॅड. शरद सोमाणी, खजिनदार हरिनारायण खटोड, सहसचिव दिपक सिकची, विश्‍वस्त बापूसाहेब पुजारी, राजेंद्रप्रसाद उर्फ नंदूशेठ खटोड, भरत साळुंके, अ‍ॅड. विजय साळुंके, प्रेमा मुथ्था, चंद्रशेखर डावरे, रविंद्र खटोड, श्रीवल्लभ राठी, नारायणदास सिकची, राजेंद्र सिकची, प्रा. हंबीरराव नाईक, सुविद्या सोमाणी, शिक्षक प्रतिनिधी प्रा. नामदेव मोरगे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे , वाणिज्य विभाग प्रमुख व अकाउंटन्सीचे विषय शिक्षक प्रा. प्रकाश देशपांडे, डॉ. अशोक माने, डॉ. भाऊसाहेब पवार, सर्व प्राध्यापक, प्राध्यापेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

COMMENTS