Homeताज्या बातम्यादेश

देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय : केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या जामीनाची मुदत संपत आल्यामुळे 2 जूनला केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आह

केजरीवालांना न्यायालयाचा झटका
केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर
केजरीवालांना दिलासा नाहीच

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या जामीनाची मुदत संपत आल्यामुळे 2 जूनला केजरीवालांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. मात्र त्यापूर्वी एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून, त्यात केजरीवाल काहीसे भावूक होतांना दिसून येत आहे. यात केजरीवाल म्हणतात  मी कुठे असो, आत किंवा बाहेर, दिल्लीचे काम थांबणार नाही. हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे. असेही केजरीवाल म्हणाले.
पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की, मला सर्वोच्च न्यायालयात प्रचारासाठी 21 दिवसांची परवानगी देण्यात आली होती. उद्या 21 दिवस पूर्ण होत आहेत. मला परवा आत्मसमर्पण करावे लागेल. मी परवा तुरुंगात जाईन. या वेळी हे लोक मला किती दिवस तुरुंगात ठेवतील माहीत नाही, पण माझी एक गोष्ट ऐका की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे. त्यांनी मला अनेकदा तोडण्याचा प्रयत्न केला, मला झुकवण्याचा प्रयत्न केला. पण मी झुकलो झालो नाही. मी तुरुंगात असतानाही त्यांनी माझा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी माझी औषधे बंद केली. मी 30 वर्षांपासून गंभीर मधुमेहाचा रुग्ण आहे. मी दिवसातून चार वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेतो. त्यांनी माझे इंजेक्शन बरेच दिवस बंद केले. त्यामुळे शुगरमुळे गंभीर आजार होण्याचा धोका बळावला आहे, पण तरिसुद्धा मी लढणार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, मी 50 दिवस तुरुंगात राहिलो आणि या 50 दिवसांमध्ये माझे वजन 6 किलोने कमी झाले. मी तुरुंगात गेलो, तेव्हा माझे वजन 70 किलो होते. आज 64 किलो आहे. तुरुंगातून सुटल्यानंतरही माझे वजन वाढत नाही. शरीरात काही मोठा आजार होऊ शकतो, अनेक तपासण्या कराव्या लागतील, असे डॉक्टर सांगत आहेत. माझ्या लघवीत केटोनची पातळीही खूप वाढली आहे. शरण येण्यासाठी मी दुपारी 3 वाजता माझ्या घरातून बाहेर पडेन. कदाचित यावेळी ते माझ्यावर आणखी अत्याचार करतील. पण मी झुकणार नाही. स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात मला तुमची खूप काळजी लागून राहाते. तुम्ही खुश असाल तर तुमचे केजरीवालही खुश राहतील असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

COMMENTS