इस्लामपूर / प्रतिनिधी : बहादुरवाडी (ता. वाळवा) येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या ’जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कविता संग्रहास गोवा येथी

इस्लामपूर / प्रतिनिधी : बहादुरवाडी (ता. वाळवा) येथील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या ’जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कविता संग्रहास गोवा येथील गोमंतकीय साहित्य सेवक संस्थेतर्फे देण्यात येणारा पहिलाच कै. ब्रम्हराज उत्कृष्ट वाड.मय निर्मिती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गोवा आणि महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कविता संग्रहातून या संग्रहाची उत्कृष्ट संग्रह म्हणून निवड करण्यात आली आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळ संस्था 98 वर्षे जुनी असून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कलाकृतींचा पुरस्कार देऊन गौरव करते. तज्ञ परीक्षक समितीने महाराष्ट्रातील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या कविता संग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा हा पहिलाच पुरस्कार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी दिली. 10 हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते 27 मार्च रोजी पणजी (गोवा) येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या कविता संग्रहास पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, लोकनेते राजारामबापू उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, कवयित्री शैला सायनाकर साहित्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, इ. सन्मान मिळाले आहेत.
COMMENTS