Homeताज्या बातम्यादेश

गो फर्स्ट विमानसेवा दिवाळखोरीत

अचानक विमान सेवा केली बंद ः प्रवाशांचा संताप

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः विमानसेवेतील आघाडीची कंपनी असलेली गो फर्स्ट कंपनी सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, या कंपनीने बुधवारी आपल्या अचानक बंद

उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू
पोलिस अधीक्षक विशाल आनंद  यांची पत्रकार परिषद 
मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये -किरीट सोमय्या 

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः विमानसेवेतील आघाडीची कंपनी असलेली गो फर्स्ट कंपनी सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, या कंपनीने बुधवारी आपल्या अचानक बंद केल्याने प्रवाशांचा प्रचंड संताप बघायला मिळाला. प्रवाशांनी थेट डीजीसीएकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन माहितीशिवाय उड्डाणे रद्द का केली या संदर्भात गो फर्स्ट कंपनीला डीजीसीएने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
देशात गो फर्स्ट ही कंपनी विमान प्रवास सेवेत आघाडीवर आहे. सध्या ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडली आहे. ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. दरम्यान, गो फर्स्टने बुधवार आणि गुरूवारची सर्व उड्डाणे रद्द केली. दरम्यान, यावर कंपनीने इंजिनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे उड्डाणे रद्द करत असल्याचे कारण दिले. अचानक सर्व उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. या मुळे प्रवाशी संतप्त झाले. अनेकांनी गो फर्स्टविरोधात तक्रारी केल्या काही प्रवाशांनी समाज मध्यमावरही तक्रारी केल्या. गो फर्स्ट आर्थिक अडचणीत असल्याने एनसीआयटीकडे दिवाळखोरी घोषित करण्यासंदर्भात तक्रार केली आहे. ही कंपनी वाडिया ग्रुपची आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीची पत खालवत आहे. यामुळे कंपनीने सर्व उड्डाणे कुठलीही पूर्वसूचना न देता रद्द केली आहे. दरम्यान, गो फर्स्ट एअरलाईन्सने तेल कंपन्यांची थकबाकी भरण्यास असमर्थता दाखवली आहे. या सोबतच विमान कंपनीसाठी इंजिन बनवणार्‍या प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीने इंजिन पुरवठा देखील बंद केला. त्यात कंपनीकडे निधीची मोठी कमतरता आहे.
गो फर्स्टच्या श्रीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई या दोन विमानांचे सूरत विमानतळावर लँडींग करण्यात आले. त्यामुळे या विमानातील प्रवाशी ताटकळत बसले आहेत. दिल्ली ते मुंबई आणि श्रीनगर ते मुंबई या दोन विमानांना सूरतकडे वळवण्यात आली होती. आता मात्र ही दोन विमाने सूरतवरुन निघाल्याची माहिती सूरत विमानतळाचे संचालक रूपेश कुमार यांनी दिली. मात्र सुरत विमानतळावर लँडींग का करण्यात आले, याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही. श्रीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई या दोन विमानांना मंगळवारी संध्याकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान सूरत विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व प्रवासी अजूनही विमानात आहेत. लँडिंगचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सूरत विमानतळाचे संचालक रुपेश कुमार यांनी सांगितले आहे.

प्रवासी चार तास बसले ताटकळत- दिल्ली ते मुंबई आणि श्रीनगर ते मुंबई या दोन विमानांना सूरत विमानतळावर वळवण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. हे प्रवाशी चार तासांपेक्षाही जास्त काळ विमानतळावर अडकले. आम्हाला चार तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहत ठेवण्यात आले. आमची सर्व योजना थांबवण्यात आली आहे. आम्हाला येथे थांबणे खूप अवघड आहे, असे श्रीनगरहून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाने यावेळी सांगितले.

’डीसीजीए’ने बजावली नोटीस – देशातील वाडिया समूहाची खासगी विमान कंपनी गो-फस्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. ‘गो-फस्ट’ने आर्थिक अडचणीमुळे आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. याची दखल घेत ‘डीसीजीए’ने गो-फस्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गो-फस्टचा कंपनीकडे पैशांची मोठी कमतरता आहे. विमान कंपनीचा निधी संपला आहे. यामुळे ते तेल कंपन्यांची थकबाकी भरू शकत नाहीत. या कंपन्यांनी त्यांना तेल देण्यास नकार दिला आहे.

COMMENTS