Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा गौरव अकोल्यासाठी अभिमानाची बाब ः विजय पवार

अकोले ः राज्य स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुरशेत येथील कु दीक्षा शंकर सोनवणे हीचा तसेच वामन दादा कर्डक जीवनगौरव पुरस्का राने सन्मानी

तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू
नगरला होणारे अंत्यविधी स्थानिक स्तरावर करा
नगर शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट…

अकोले ः राज्य स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुरशेत येथील कु दीक्षा शंकर सोनवणे हीचा तसेच वामन दादा कर्डक जीवनगौरव पुरस्का राने सन्मानीत तालुक्यातील सुरेशराव देठे, बाळासाहेब साबळे, कवी अशोक शिंदे, लेखक दीपक गायकवाड व गवनेर सरोदे यांचा राजूर येथे सत्कार नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पवार हे होते सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ पवार मित्रमंडळ अकोले व आंबेडकरी चळवळीचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सुरेशराव देठे, बाळासाहेब साबळे , कवी अशोकराव शिंदे, लेखक दिपकराव गायकवाड व गवनेर सरोदे यांचा सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे कवि वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कारार्थींचा व राज्यसरावर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु दीक्षा सोनवणे हिचा राजुर विभागातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय पवार मिञ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव ही तालुक्याला अभिमानाची बाब असल्याचे यावेळी विजयभाऊ पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइंचे भंडारदरा विभाग प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी केले. पुरस्कार सन्मानीत मान्यवरांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुरशेत गावची कन्या दिक्षा शंकर सोनवणे हिची राज्य स्थरिय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने तिचा अकोले करांच्या वतीने शाल; पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. अजय पवार, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष पवार, कैलास रोकडे, सुनिल भद्रिके, भारतीय बौध्द महा.सभेचे तालुकाध्यक्ष राजु बबन देठे, प्रविण देठे, स्वप्नील शेणकर, रिपाइंचे शहराध्यक्ष दिपक आढाव, उत्तम पवार, अक्षय पवार, रिपाइंचे सचिव सुधिर पवार, गोरख परते, शंकर सोनवणे, इंदुबाई सोनवणे, चंद्रभागा सोनवणे, सुमनताई सोनवणे, सुमनताई पवार आदी असंख्य महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS