Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासींना टँकरने पाणी द्या

संभाजी ब्रिगेडची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी गाव भिंगाण खालसा, भिंगाण दुमाला, गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवे

नवोदय परीक्षेत श्रुतिका झगडेची निवड
जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण
‘समृद्धी’च्या 26 किलोमीटरच्या सर्व्हिस रोडसाठी 52 कोटी मंजूर

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी गाव भिंगाण खालसा, भिंगाण दुमाला, गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदन तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना संभाजी ब्रिगेडने दिले असून भिंगाण आदिवासी गाव श्रीगोंदा शहरापासून अवघे पाच किलोमीटर हाकेच्या अंतरावर आहे.
विहिरींचे बोरचे पाणी आटल्याने परिसरात गावकर्‍यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे भौगोलिक दृष्ट्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडी लाभक्षेत्रातील दक्षिणेकडील टेल चे गाव भिंगाण खालसा तसेच भिंगाण दुमाला या दोन्ही गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे परिसरामध्ये कोठेही पाण्याचे उद्भव नसल्याने गावकर्‍यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे तहसीलदार मॅडम यांनी तातडीने या गावांना पिण्याचे पाणी लवकरात लवकर टँकरद्वारे द्यावे श्रीगोंदा तालुक्यात कुकडी प्रकल्प पाणी अद्याप या गावाला कधीच मिळाले नाही मेन कॅनल 16 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे कुकडीचे पाणी न आल्याने या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे तसेच गावच्या जवळून दोन किलोमीटरवर घोड कॅनल आहे त्या ठिकाणी एखाद्या विहिरीचा उद्भव उपलब्ध करून टँकरद्वारे गावाला वेळेवर पाणी द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS