Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियमित पिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान द्या – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

“मी आठ दिवसात परत नगरला येणार, क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो – ना. सुनील केदार
 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे
पाथर्डी पूर्व भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ऋषिकेश ढाकणे यांनी पाहणी केली

कोपरगाव प्रतिनिधी ः आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित पीक कर्ज भरीत होते त्या शेतकर्‍यांना देखील 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून कोपरगाव मतदार संघातील काही शेतकर्‍यांना हे अनुदान मिळाले आहे. उर्वरित नियमित कर्जफेड करणारे अनुदानास पात्र शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे या पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदान तातडीने जमा करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, शेतकर्‍यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक चिंता दूर झाल्या आहेत. परंतु जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करीत होते त्या शेतकर्‍यांना देखील या कर्जमाफी योजनेचा फायदा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून कोपरगाव तालुक्यातील 6500 शेतकर्‍यांपैकी 746 शेतकर्‍यांना या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला असून ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. परंतु अजूनही हजारो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे या शेतकर्‍यांना ही अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी तसेच मागील दोन वर्षाच्या काळात ज्या शेतकर्‍यांच्या नावावर पीक कर्ज होते असे जवळपास 71 कर्जदार शेतकरी मृत्यु पावले आहेत परंतु त्या मृत्यु झालेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाची रक्कम ही त्यांच्या वारसाने नियमितपणे भरून कर्ज फेड केली आहे. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या वारसांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे व हे अनुदान वाटप करतांना या शेतकर्‍यांच्या वारसांचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही अशा शेतकर्‍यांचे अर्ज भरणे बाकी आहेत त्या शेतकर्‍यांनी कोळपेवाडी व कोपरगाव येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रोत्साहनपर अनुदान मागणी अर्ज भरून द्यावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

COMMENTS