पुणे : पुण्यातील विश्रामबाग परिसरातील भावे उच्च प्राथमिक शाळे जवळ घडलेला अपघात चिंतेची बाब आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार
पुणे : पुण्यातील विश्रामबाग परिसरातील भावे उच्च प्राथमिक शाळे जवळ घडलेला अपघात चिंतेची बाब आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे जवळपास १२ विद्यार्थी या अपघातात जखमी झाले असून यातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.आज, रविवारी असलेल्या एमपीएससी च्या परीक्षेपासून जखमी विद्यार्थी मुकण्याची शक्यता आहे. अशात या विद्यार्थ्यांबद्दल मानवीय दृष्टिकोन सरकार ने ठेवणे आवश्यक आहे,असे मत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी रविवारी (ता.१) व्यक्त केले
जखमी विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षेची विशेष संधी द्यावी,अशी मागणी देखील त्यांनी केली.बसप यांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एमपीएससी सोबत पत्रव्यवहार करणार असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.शनिवारी संध्याकाळी अपघात घडल्यानंतर जखमी तरुणांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्या उपचारावर झालेला खर्चाचे वहन सरकार ने करावे जेणेकरून तरुणांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही,अशी मागणी देखील बसप कडून करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी आरोपी वाहनचालक जयराम मुळे,सहप्रवासी राहुल गोसावी तसेच गाडी मालकाला अटक केली आहे.परंतु, पुण्यात वाढते अपघात लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून कठोर उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.मद्यप्राशन करीत गाडी चालवण्याचे प्रकार पुण्यात वाढले आहेत. यातून अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी मद्यपी चालकांविरोधात धडक मोहीम आखावी,असे आवाहन देखील त्यांनी केले.अँप बेस्ड कॅब सर्व्हिस कंपन्यांनी वाहन नियुक्त करतांना संबंधित चालकाला वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आहे की नाही? याची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.
COMMENTS