Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्य संमेलनासाठी 50 लाखांऐवजी 2 कोटींचे अनुदान द्या – केसरकर

मुंबई/प्रतिनिधी ः सरकाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तीन दिवसांच्या विश्‍व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देव

दोन टप्प्यात 50 हजार शिक्षकांची भरती
शाळांमध्ये बसवणार पॅनिक बटन
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

मुंबई/प्रतिनिधी ः सरकाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तीन दिवसांच्या विश्‍व मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सरकारकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीत वाढ करण्याची मागणी केली आहे.
सरकार सध्या साहित्य संमेलनासाठी 50 लाखांचे अनुदान देते, हा निधी 2 कोटीपर्यंत द्यावा, अशी मागणी केसरकर यांनी केली आहे. वाढते खर्च पाहून हा निधी वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या संमेलनासाठी देशभरातून 800 आणि परदेशातून 500 जणांची नोंदणी झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीमुळे उच्च शिक्षणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे लकवकरच राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे शिक्षण मराठीत मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केलाय. वाईत मराठी विश्‍वकोष मंडळाचे नवे कार्यालय बांधून तर्कतीर्थांचे स्मारक उभारणार असल्याचे त्यांनी सांगतिले. मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी भाषा भवनात अनेक उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेवर अन्याय होऊ देणार नाही, मुंबईतून मराठी हद्दपार होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. दीपक केसरकर यांनी 2024 साली तुरुंगात जाण्याची तयारी करावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावरही भाषणात केसरकर यांनी उत्तर दिलंय. विरोधात बोललो म्हणून तुरुंगात टाकणारं सरकार आता बदललेलं आहे. असं ते म्हणाले. आता कितीही टीका केली तरी हसून आम्ही दुर्लक्ष करु आणि मराठीचास महाराष्ट्राचा विकास करु असंही केसरकर म्हणाले.

COMMENTS