Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटे कथानक पसरवणार्‍यांना सडेतोड उत्तर द्या ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ः खोटे कथानक तयार करून, लोकांना भावनिक करणार्‍यांचे पीक मोठ्या प्रमाणावर आले असले तरी, आता गाफील राहू नका. आम्हीही गाफील राहिलो मात्र आता स

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू ः मुख्यमंत्री शिंदे
मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले ः मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री शिंदे तीन दिवसाच्या सुटीवर ?

मुंबई ः खोटे कथानक तयार करून, लोकांना भावनिक करणार्‍यांचे पीक मोठ्या प्रमाणावर आले असले तरी, आता गाफील राहू नका. आम्हीही गाफील राहिलो मात्र आता सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्री शिंदे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे विवेक विचार मंच आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत बोलत होते. तसेच खोटे कथानक पसरवणार्‍यांना सडेतोड उत्तर द्या असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता गाफील राहू नका. कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्‍वासाने आम्हीही गाफील राहिलो. सर्व मीडिया, चॅनेलवर आकडे पाहत होतो. लोकसभेत जे झाले ते झाले. मात्र आता खोटं पसरवणार्‍यांपासून आपण सावध राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पुढे शिंदे म्हणाले, ’’लोकसभा निवडणूक झाली. त्यामध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केले. खोट्या बातम्या पसरवल्या. घटना बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार अशी भीती पसरवली. एकीकडे आपल्या देशाचे नाव जगात घेतले जात आहे. पूर्वी पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर युनोमध्ये जाऊन आपले (पूर्वीचे) पंतप्रधान म्हणायचे की यावर काही तरी केले पाहिजे. पण आता पाकिस्तानने हल्ला केला तर पंतप्रधान थेट घुसके मारेंगे म्हणतात, असे म्हणत शिंदेंनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे.

COMMENTS