नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा 2022 चा निकाल मंगळवारी जाहीर केला. यात दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला असून, या परीक्षेत महाराष्ट्रातील 15 उमेदवारांनी यश मिळवले आहे.
युपीएससी परीक्षेच्या निकालात इशिता किशोर पहिल्या स्थानावर आहे. पहिला क्रमांक आल्यानंतर इशिताने आनंद व्यक्त केला असून यशाची पूर्ण खात्री होती असे म्हटले. दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र विषयात शिक्षण घेत असलेल्या इशिताचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. मला यशाची पूर्ण अपेक्षा होती, पण गुणवत्ता यादीत पहिला क्रमांक मिळणे हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे, असे इशिताने सांगितले. इशिताच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत. युपीएससी मंगळवारी नागरी सेवा परीक्षा (युपीएससी सीएसई 2022) चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. परीक्षेच्या अंतिम निकालात एकूण 933 उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड करण्यात आली आहे. यापैकी 345 उमेदवार अनारक्षित, 99 आर्थिक मागास, 263 ओबीसी, 154 अनुसूचित जाती आणि 72 अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. यासोबतच 178 उमेदवारांची राखीव यादीही तयार करण्यात आली आहे. आयएएस पदांवर निवडीसाठी 180 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
COMMENTS