गेवराई प्रतिनिधी - कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे दि. 12 रोजी गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे व विस्तार अधिकारी काळम पाटील यांच्या प्रमुख उपस्
गेवराई प्रतिनिधी – कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे दि. 12 रोजी गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे व विस्तार अधिकारी काळम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक मेळावा प्रकार चारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी म्हणाले कि, मुलिंनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी व जिद्द ठेवावी.
याप्रसंगी पुढे बोलतांना गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे म्हणाले कि,विद्यालयाच्या अडचणी सोडवण्यााठी मी प्रयत्न करणार तसेच मुलींनी आत्मनिर्भर व्हावं व लग्न वय 18 पूर्ण असल्याशिवाय करू नये याबाबत पालकांना सूचना दिल्या विद्यालयाच्या वाटचालीबाबत साहेबांनी समाधान व्यक्त केले. शिकेल तोच टिकेल आजचे जग महिलांचं आहे. यापुढे मातृसत्ताक पद्धती रुजणार सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून आपल्या जिल्ह्याच्या खा. प्रितम ताई मुंडे व जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम, जगताप मॅडम सहायक संचालक आहेत याप्रकारे आपणही नाविण्यातेचा ध्यास घ्यावा असे त्यांनी मुलिंना मोलाचे मार्गदर्शन केले.10वी व 12 परीक्षेत विद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थी वैष्णवी भराडी 92 मार्क्स व पवार अंजली 89 मार्क्स सर्व गुणवान मुलींचा सत्कार केला .ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी काळम पाटील यांनी पालकांना निकष पात्र विद्यार्थिनीना आपण या योजनेचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले सर्व शिक्षक तसेच विद्यालयातील संपूर्ण स्टाफ आपल्यासाठी निष्ठेने काम करत आहे आदर्श विद्यालय झाल्यामुळे नवनवीन शैक्षणिक साहित्य, संगणक,रोबोटिक लॅब,वाचनालय सुविधा मिळत आहे. तारुकर सर यांनी इतर शाळांच्या तुलनेत ही शाळा नक्कीच नवनवीन प्रयोग करत आहे विद्यार्थी संगीत,चित्रकला, गायन,जिल्हा पातळी खेळ,अन् गुणवत्तेत अव्वल स्थान मिळवत आहेत याच श्रेय संपूर्ण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय टीम ला जाते. आपल्या विद्यालयाचा आलेख असाच उंचावत जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. अन् मुलींना दिल्या जाणार्या सुविधा, जेवण,नियोजन याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अधीक्षक खांबट मॅडम,धस प्रमिला,थोटे अनुसया,आंधळे स्मिता,सोळुंके सरला,सोनवणे वर्षा,पवार सुनिता सह विद्याथीॅ व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका कदम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या आवरात वृक्षारोपण करण्यात आले.
COMMENTS