नवी दिल्ली प्रतिनिधी - सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्रवासी भांडताना दिसून येतात तर कधी प्रवासी गाणं म्हणताना
नवी दिल्ली प्रतिनिधी – सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्रवासी भांडताना दिसून येतात तर कधी प्रवासी गाणं म्हणताना दिसून येतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे. दरदिवशी लाखो लोकं मेट्रोनी प्रवास करतात. अनेकदा मेट्रोमध्ये गर्दी असते पण मेट्रोत गर्दी नसेल तर अनेक प्रवासी रिल्स – व्हिडीओ बनवताना दिसून येतात. ही तरुणीसुद्धा मेट्रोतील कमी गर्दी पाहून रिल्स बनवताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल हा व्हिडीओ दिल्लीचा आहे पण ही दिल्लीतील मेट्रो नाही तर भोपालची मेट्रो आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे. दोन तरुणी तिचा व्हिडीओ शुट करताना दिसत आहे. मेट्रोमध्ये गर्दी खूप कमी आहे पण दुरवरुन काही लोक डान्स करणाऱ्या तरुणीकडे बघताना व्हिडीओत दिसत आहे. bhopali_buzz’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भोपाल मेट्रोत आपले स्वागत आहे” या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ” किसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे” हे गाणं लावण्यात आलं आहे. दिल्ली मेट्रोतील सुद्धा अनेक प्रकरणे नेहमी चर्चेत येतात. कधी भांडणाचे व्हिडीओ तर कधी गैरवर्तणूकीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोत डान्स करतानाचे व्हिडीओ सुद्धा यापूर्वी अनेकदा व्हायरल झाले आहेत.
COMMENTS