नांदेड : लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार दिल्याने युवकाने तरुणीला विष पाजून तिचा खून केला. यानंतर स्वतः विष पिऊन युवकाने देखील आत्महत्या करण्याचा प

नांदेड : लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार दिल्याने युवकाने तरुणीला विष पाजून तिचा खून केला. यानंतर स्वतः विष पिऊन युवकाने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे ही घटना घडली. भोपाळवाडी (जि. नांदेड) या गावातील 23 वर्षीय तरुणी सुप्रिया जाधव हिचे गावातीलच रोहीदास जाधव (वय 25) तरुणासोबत प्रेमसंबध होते. दरम्यान एका रात्री दोघांना मुलीच्या आईने एकत्र पाहिले. परंतु, दोघांची लग्नाची तयारी असल्याने मुलाने मुलीच्या आईकडे लग्नाची मागणी घातली. पण मुलींच्या आईने नकार दिला.
COMMENTS