कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कोपरगाव ता
कोपरगाव/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंगणापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कोपरगाव तालुका कापूस जिनिंग प्रेसिग सोसायटीचे संचालक संजय संवत्सरकर, गौतम बँकेचे माजी संचालक जालिंदर संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन संवत्सरकर, गणेश उंडे, माजी सरपंच लालाभाऊ आजगे, माजी सदस्य अनिल कुर्हे यांनी 10 खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या आहेत.
यावर्षी आ.आशुतोष काळे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने,सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. या आव्हानाला साथ देत शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळेस 10 खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अलका उंडे, कैलास संवत्सरकर, प्रकाश कुर्हे, देविदास आढाव, युवराज कुर्हे, देविदास कुर्हे, भगवान संवत्सरकर, शिल्पा संवत्सरकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन भवरे, ग्रामसेवक अविनाश पगारे आदी उपस्थित होते.तसेच कोपरगाव शहरात देखील आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगांव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांच्या वतीने नविन प्रभाग क्रमांक 8 मधील हनुमान मंदिर, श्री.लक्ष्मीआई माता मंदिर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बाकडे भेट देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नवाज कुरेशी, हारुन शेख, सनी डहाके, ॠषिकेष धुमाळ, सुनिल राठी, सचिन शिंदे, ओंकार देवडे, मयुर शिवदे आदी उपस्थित होते.
COMMENTS