नांदेड प्रतिनिधी - दिव्यांग, वृध्द वा आजारी रुग्णांसाठी राज्यात बोटावर मोजण्या इतक्या बसस्थानकावर सोयीसाठी व्हीलचेअरची सुविधा नाहीये. मात्र नांद

नांदेड प्रतिनिधी – दिव्यांग, वृध्द वा आजारी रुग्णांसाठी राज्यात बोटावर मोजण्या इतक्या बसस्थानकावर सोयीसाठी व्हीलचेअरची सुविधा नाहीये. मात्र नांदेड एसटी आगाराशी संलग्न विश्वासू प्रवासी संघटनेच्या पुढाकारातून प्रथमच दोन व्हील चेअर रविवारी, 28 मे रोजी भेट म्हणून देण्यात आल्या.
विश्वासू प्रवासी संघटना नांदेड स्थापन झाल्यापासून विविध विकास कामे, सोयीसुविधा, बसस्थानकातील पुलाखालील रस्त्याचे सिमेंटीकरण, बसस्थानक परिसरातील सिमेंट काँक्रीटीकरण आदी कामे वेगाने पूर्णत्वास जात आहेत. आता संघटनेने आणखी काही सुविधा पुरवण्याचा संकल्प करीत दिव्यांग, आजारी वा वृध्द प्रवाशांच्या सेवेकरीता 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती दिनी 2 व्हील चेअर भेट दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्याहस्ते करण्यात आले. या व्हीलचेअर बसस्थानक प्रमुखांच्या हवाली करण्यात आल्या असून गरजूंनी बसस्थानक प्रमुख कक्षाशी संपर्क साधून या व्हीलचेअरचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेने केले आहे. तसेच संघटनेने दर रविवारी सकाळी 7 वाजता बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान सुरु केले असून प्रवाशांमध्येही मोठी जनजागृती केली जात आहे. व्हील चेअर लोकार्पण सोहळयास बसस्थानक प्रमुख यासीन खान, संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर, सचिव प्रा.सौ.ललिता कुंभार, नेहा शर्मा, कोषाध्यक्ष बालाजी पवार, राजकमलसिंघ गाडीवाले, लिपीक सुरेश फुलारी, वाहतूक निरीक्षक आ.वि.भिसे,दयानंद लाडे, भोकर आगाराचे चालक मो.ताजुद्दीन, चेतन दरमेश्वर, सफाई कामगार अजय मचल, कपिल सोनसळे, स्वच्छक वंदनाबाई, अरुणाबाई, वाघमारे बाई, खाजा अहमद, कंधारेबाई उपस्थित होते. तसेच बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान ही राबविण्यात आले.
COMMENTS