Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट

बालाजी देडगाव ः नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नवे देडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाचनालयास सामाजिक कार्यकर

विद्यार्थ्यांसाठी मी मोठा भाऊ म्हणून सदैव पाठीशी
नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |
धामणगाव पाठ येथे आजपासून खंडोबा यात्रा उत्सव

बालाजी देडगाव ः नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नवे देडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाचनालयास सामाजिक कार्यकर्ते, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर (माऊली शेठ) देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, विज्ञान, गणित, इंग्रजी स्पर्धा परीक्षा विषयक तसेच थोर महापुरुषांचे पुस्तके भेट दिली.
यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचा जाहीर सत्कार करुन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक दानियल दळवी, मनोहर मिरपगार, ग्रामपंचायत सदस्य आनंदा दळवी, पोपट मुंगसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, प्रदीप मिरपगार, संदीप मिरपगार, महेश दळवी, अविनाश दळवी, अक्षय ससाणे, काळे बंधु व ग्रामस्थ उपस्थित होते. आनंद दळवी यांनी देशमुख यांचे कौतुक करत शाळेत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता व एकंदरीत शालेय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन मुख्याध्यापक अभिषेक घटमाळ यांनी केले तर आभार सहशिक्षिका श्रीमती मनिषा कांबळे यांनी केले. वरील उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS