Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अँग्लो उर्दू हायस्कूलला 24 संगणकांची भेट

राजहंस पतसंस्था आणि ज्ञानमाता माजी विद्यार्थी संघ यांचा उपक्रम

संगमनेर/प्रतिनिधी ः येथील राजहंस नागरी सहकारी पत संस्थेकडून 21 तर ज्ञानमाता माजी विध्यार्थी सेवाभावी संस्थेच्या वतीने 3 असे 24 संगणक संच अँग्लो उ

संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात
सरपंचाला घातला चप्पलांचा हार.. कठोर कारवाई करण्याची मागणी (Video)
शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  

संगमनेर/प्रतिनिधी ः येथील राजहंस नागरी सहकारी पत संस्थेकडून 21 तर ज्ञानमाता माजी विध्यार्थी सेवाभावी संस्थेच्या वतीने 3 असे 24 संगणक संच अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळे साठी भेट देण्यात आले. संगमनेर शहरातील अग्लो उर्दू हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण सेवानिवृत्त न्यायाधीश, सलगु लाम्दास्तगीरखान उमरखान मुल्ला यांचे शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँग्लो उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मुश्ताक उस्मान कालादगी यांनी भूषविले. यावेळी अंगलो उर्दू हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष गनीहाजी शेख, अंजुमने इस्लाम ट्रस्टचे ट्रस्टी एजाज शमशुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते. अंजुमने इस्लाम ट्रस्ट व अंग्लो अंगलो उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्याल याच्या वतीने वतीने राजहंस नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी तसेच ज्ञानमाता माजी विध्यार्थी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्‍वस्त यासर्वांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणार्‍या माजी विद्यार्थीचा संस्थेचे अध्यक्ष गनी हाजी शेख आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी व यश संपादन केले त्याबद्दल सारा इम्रान शेख, आदी नुरमोहम्मद शेख, सुफियान इरफान शेख जारा इम्रान शेख या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह देत सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयाचे प्राचार्य रीझवाना फकीरमोहम्मद शेख, प्रवेक्षकमुनव्वर खालीलुर्रहमान शेख यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुनव्वर खालीलुर्रहमान शेख व मुश्ताक फखरेआलाम सय्यद यांनी केले, तर अंजुमने इस्लाम ट्रस्टचे ट्रस्टी हाजी पठाण शौकतखान मोहम्मदखान यांनी आभार मानले.

COMMENTS