Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गझल गायक पंकज उधास यांचे निधन

मुंबई ः आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या आणि विविध गझल गाणार्‍या गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. पंकज उधास 72 वर्षांचे

खोट्या सह्या प्रकरणी मनसे रायगड जिल्हा महिला अध्यक्षांवर गुन्हा दाखल  
चक्क ! 35 ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड LOKNews24
मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक

मुंबई ः आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या आणि विविध गझल गाणार्‍या गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. पंकज उधास 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है..’ सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.

COMMENTS