शिवसेना संपवण्याचा घटकपक्षांचा डाव – उदय सामंत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना संपवण्याचा घटकपक्षांचा डाव – उदय सामंत

मुंबई : मी आजही शिवसेनेसोबतच आहे. पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा डाव मविआतील मित्रपक्षांनी आखला आहे, अशी टीका रत्ना

व्यावसायिकाने पोलिस ठाण्यातच घेतले पेटवून
सामंथासोबत घटस्फोटाच्या 2 वर्षानंतर पुन्हा लग्न करतोय नागा चैतन्य ?
Solapur : क्रेनखाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू (Video)

मुंबई :

मी आजही शिवसेनेसोबतच आहे. पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्याचा डाव मविआतील मित्रपक्षांनी आखला आहे, अशी टीका रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी आज फेसबुकवरून केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना साथ देणाऱ्या मंत्र्यांचे पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतले आहे. श्री. सामंत यांचे उच्च आणि तंत्रशिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविले आहे. त्यामुळे आता श्री. सामंत मंत्री राहिलेले नाहीत. रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार या नात्याने त्यांनी आज समाजमाध्यमावरून रत्नागिरी मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, घटकपक्षांच्या वागण्यामुळे शिवसेनेला वाईट नजर लागली आहे. त्यातून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थनार्थ मी गुवाहटीत आलो आहे. ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून तिकीट देण्यात येणार होते. पण त्यानंतर एका सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने तिकीट दिले. त्या शिवसैनिकाला राज्यसभेत कसे जाता येणार नाही याचा संपूर्ण बंदोबस्त काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला. आपली बाजू मतदारांनीही समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

COMMENTS