शेवगाव तालुका ः शेवगाव-पाथर्डी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी शेवगांव तालुक्यातील बनावट शेअर मार्केट कंपन्यामध्ये सुमारे 2 हजार कोटी रूपयांची गु
शेवगाव तालुका ः शेवगाव-पाथर्डी तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी शेवगांव तालुक्यातील बनावट शेअर मार्केट कंपन्यामध्ये सुमारे 2 हजार कोटी रूपयांची गुंतवणुक केली आहे. यामध्ये सुमारे 15 ते 20 हजार नागरिकांनी गुंतवणुक केलेली आहे. तालुक्यात सुमारे 10ते 12 बनावट शेअर मार्केट कंपन्यांनी जास्त व्याजाचे आमीश दाखवत आपले दलालांमार्फत भरमसाठ पैसा गोळा केला आहे. या बनावट कंपन्यामध्ये अडकलेले नागरिकांचे पैसे परत मिळावे, याकरीता आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांचा पैसा मिळावा अशी विनंती केली. आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक यांना सदरबाबी गुन्हे दाखल करणेकरीता निवेदन दिलेले आहे. या ट्रेडींग कंपन्या व एजंट कंपन्यांना टाळे लावून, शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्यांचे चालक व एजंट फरार झाले आहेत. त्यामुळे हजारो नागरीक, व्यावसायीक, गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने, मोर्चा, निवेदने देवून पोलीस स्टेशनला या शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्या व एजंटवर गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्हयांचा तपास होवून गुन्हेगारांना पकडून गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळावेत, ही नागरिकांची अपेक्षा असुन नागरिकांनी याकामी आमदार मोनिका राजळे यांना विधानसभेत सदर बाबी जाब विचारणेकरिता मागणी केली होती. शेवगाव तालुका व परिसरातील हजारो गोरगरीब, लहान व्यावसायीक, महीला यांनी आपल्या जवळची जमा पुंजी यामध्ये गुंतविली आहे. कुणी शेती गहाण ठेवून, कुणी दागिने गहाण ठेवून, कुणी बचत गटातून पैसे उचलून, कुणी आपली गाय, बैल, शेळया जनावरे विकून पैसे ऊभे केले व या शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये गुंतविले आहेत. हजारो गोरगरीब, सर्व सामान्य, महीला व मजूर यांची या बनावट शेअर मार्केट ट्रेडींग कडून फसवणूक झाली आहे. या सर्वसामान्य नागरीक, गोरगरीब, महीला, माता-भगिनी, मजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी या परिसरातील शेअर मार्केट ट्रेडींग कंपन्या चालक, एजंट, यांचेवर गुन्हे दाखल होवून, तात्काळ योग्य तपास करून या आरोपींच्या मालमत्ता जप्त होवून ्र गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना संबधीतांना दिल्या आहेत. तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चा दरम्यान मतदारसंघातील विविध समस्या व विकास कामाबाबत न्याय मिळण्याकरिता मागणी केली.
COMMENTS