Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे सामान्य रूग्णालय मालेगावचे होणार श्रेणीवर्धन

ग्रामीण रूग्णालय, दाभाडी येथे 20 खाटांच्या ट्रामा केअर स्थापनेस मंजुरी

नाशिक :- सामान्य रूग्णालय मालेगांवचे श्रेणीवर्धन करण्याबाबत 31 ऑक्टोबर 2023 रोजी  विशेष बाब म्हणून निर्गमित झालेल्या शासननिर्णयाद्वारे  मान्यता प

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री दादाजी भुसे
पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण

नाशिक :- सामान्य रूग्णालय मालेगांवचे श्रेणीवर्धन करण्याबाबत 31 ऑक्टोबर 2023 रोजी  विशेष बाब म्हणून निर्गमित झालेल्या शासननिर्णयाद्वारे  मान्यता प्राप्त झाली आहे. यानुसार सामान्य रूग्णालय मालेगांवचे 200 खाटांवरून 300 खाटांचे सामान्य रूग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक  बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले आहे. सामान्य रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे मालेगावकरांना उत्तम आरोग्य सेवा-सुविधांचा लाभ होणार आहे.

त्याचप्रमाणे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून मालेगाव तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय, दाभाडी येथे 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन्यासही विशेष बाब म्हणून 31 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित झालेल्या शासननिर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. 

श्रेणीवर्धीत सामान्य रूग्णालय मालेगावचे बांधकाम व पदनिर्मिर्ती याबाबत स्वंतत्र कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे  ग्रामीण रूग्णालय दाभाडी येथील 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटरसाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

COMMENTS