कोपरगाव शहर प्रतिनिधी - मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, सा

कोपरगाव शहर प्रतिनिधी – मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील, काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे.
गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. गीता जयंती निमित्त संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे प्रथम श्रीमद भगवद गीतेचे पूजन संस्थेचे मॅनजिंग ट्रस्टी विशाल झावरे , प्राचार्य सचिन मोरे व सागर खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले व शाळेच्या शिक्षिका वैशाली लोखंडे व ऋतुजा कुलकर्णी मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गीतेतील 15 व्या अध्यायाचे सामुहिक पठण विद्यार्थी व शिक्षकांनी केले. तसेच या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत गीतेचे महत्त्व सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून काही श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या वेळी शाळेच्या शिक्षिका पूनम सुर्यवंशी व शिंदे मॅडम यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रद्धा शिंदे व कु.प्राची पहिलवान यांनी केले तर आभार कु.प्रबज्योतकौर नुरी हिने मानले. शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
COMMENTS