Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये निघणार गायरान धारकांचा मोर्चा !

मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे-अविनाश जोगदंड, शाम वीर

बीड प्रतिनिधी - कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर याप्रमाणे बीड शहरातील अनेक भागात घरे बांधून समाज बांधव कुटुंबासहित वास्तंव्य करीत आहेत. तसेच बी

काय वाढीव धुतलंय पोरीने या पोरांना…एकच नंबर ! | LOK News 24
‘मायबाप’ मैफिलीतून पितृस्मृतींना उजाळा!
राजकीय सामना कोण जिंकणार ?

बीड प्रतिनिधी – कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर याप्रमाणे बीड शहरातील अनेक भागात घरे बांधून समाज बांधव कुटुंबासहित वास्तंव्य करीत आहेत. तसेच बीड तालुक्यातील गायरान धारक जमिनी कसून आपली उपजिविका भागवीत आहेत.परंतु पंजाब न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन बीड शहरातील घर धारकांना व तालुक्यातील गायरान धारकांना नोटीसा देऊन त्यांना घरापासून जमिनीपासून वंचित करण्याचे काम राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. त्यांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करून अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथारिपाइंचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.20) जून मंगळवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात अक्षय भालेराव यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. गायरान धारकांना व घर धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात. सन 1990 च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याचा शासन निर्णयाची 2005 पर्यंत मुद्दत वाढ करण्यात यावी. अशी मागणी शासन दरबारी करण्यासाठी रिपाइंच्या वतीने  मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बीड शहरातील घर धारकांनी व तालुक्यातील गायरान धारकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन रिपाइं बीड शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, युवा रिपाइं शहराध्यक्ष श्याम वीर यांच्यासह विलास जोगदंड, दिपक अरुण, भैय्या साळवे, गणेश वाघमारे,अप्पा मिसळे, पप्पू वाघमारे,प्रा.बाळासाहेब गव्हाणे,अक्षय कोकाटे,नरेंद्र वाघमारे,धम्मा पारवेकर, मिलिंद पोटभरे,आकाश वडमारे,मनोज बोराडे आदींनी केले आहे.

COMMENTS