Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावच्या भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गवळी तर शहराध्यक्षपदी साठे

कोपरगाव तालुका ः युवा नेते विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक  भाजयुमोचे कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अमोल दिलीप गवळी तर शहर अध्यक्षपदी सिद्धार्थ चंद्रका

पावसाळयातील पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवा
पेट्रोलपंपावर दगडफेक करून 115 लिटर डिझेलची चोरी
भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच

कोपरगाव तालुका ः युवा नेते विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक  भाजयुमोचे कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अमोल दिलीप गवळी तर शहर अध्यक्षपदी सिद्धार्थ चंद्रकांत साठे  यांच्या निवडीचे पत्र भाजयुमोचे उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांनी दिले. या निवडीमुळे शहर व तालुक्यासह मतदारसंघात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्ष पातळीवर संघटन मजबुतीकरण आणि निष्ठा यांच्या जोरावर यांची ही निवड झाली आहे. भाजपा नेत्या सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी संघटन विकसित करण्यासाठी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाची दखल घेत त्यांची निवड केली गेली आहे. मोठी तरुण आणि खंबीर फळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पाठीशी आहे. पक्षाचे ध्येय धोरणांची विवेक कोल्हे हे मोठ्या निष्ठतेने जपत आहेत. त्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते भाजपा व भाजयुमो मध्ये येण्यास उत्सुक आहे. या निवडीमुळे पक्ष वाढीस मोठी मदत होणार याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे ह्या निवडी राजकीयदृष्ट्या फार महत्वाच्या ठरणार आहेत. सर्वव्यापी जनतेने युवा नेते विवेक कोल्हेचं नेतृत्व मान्य करून पक्षाच्या कामाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षाशी एकनिष्ठता आणि निष्ठा ही या निवडीची जमेची बाजू आहे. यांच्या निवडीबाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या पहिल्या महिला आ. स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी नूतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS