Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी कट्टा व 6 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद  

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा शिवारात नेवासा पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे. य

कर्जत- जामखेडच्या ११५१ शिक्षकांना प्रशिक्षण
अवैध वाळू वाहतूक करणा-या तिघावर गुन्हा दाखल l LokNews24
मोहम्मद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधी कारवाई करा

अहमदनगर/प्रतिनिधी ः नेवासे तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा शिवारात नेवासा पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद केला आहे. याबाबत हवालदार शाम बाबासाहेब गुंजाळ यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमवार 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्य सुमारास माळीचिंचोराफाटा येथे एक इसम संशयीतरित्या फिरत असताना दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून त्याला नाव गाव विचारले असता त्याने आकाश संजय पवार (वय 23 रा. ब्रम्हतळे, ब्रम्हनगर नागरदेवळे, भिंगार ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा (पिस्टल) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल असा मुद्देमाल मिळून आला. सदर इसमास ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं 556/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, महिला पोलीस नाइरक सविता उंदरे, कॉन्स्टेबल सुमित करंजकर, गणेश ईथापे यांनी केली असुन पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.

COMMENTS