Homeताज्या बातम्याक्रीडा

श्रीलंकेला प्रयान करण्यापूर्वी गौतमचा पत्रकारांशी गंभीर सामना

टि२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टिम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिंबाब्वे दौऱ्यात ४-१ ने विजय मिळवून देशाची शान राखली. त्यानंतर टिम इंडिया तिन वनडे व ति

आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा
जसप्रीत बुमराहचे जंगी पुनरागमन; थेट झाला कर्णधार
मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई

टि२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टिम इंडियाच्या यंग ब्रिगेडने झिंबाब्वे दौऱ्यात ४-१ ने विजय मिळवून देशाची शान राखली. त्यानंतर टिम इंडिया तिन वनडे व तिन टि२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. तत्पूर्वी टि२० विश्वचषकानंतर तत्कालिन प्रशिक्षक राहुल द्रविडने सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा माजी डावखुरा सलामीवीर व बीजेपीचा माजी खासदार गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून निवड झाली. आपल्या सडेतोड व स्पष्ट बोलण्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या गौतम गंभीर विषयी काही प्रश्न निर्माण झाले होते. संघातील सहकाऱ्यांशी, स्टाफशी, कर्णधाराशी तो कसा जुळवून घेतो याबद्दल सर्वत्र प्रश्नचिन्हांचा गदारोळ उठला होता. त्या गदारोळातच गंभीरच्या सुचनांवरून रोहित शर्माचा टि२० चा कर्णधारपदाचा वारस नेमण्याचा सोपस्कार पार पडला. आपणास ठाऊकच आहे की, टि२० कर्णधार रोहितने विश्वचषक जिंकल्यानतर टि२० च्या आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती पत्करली होती. मागील काही मालिका व स्पर्धात उपकर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला डावलून आपला केकेआरचा जुना सहकारी व सध्या मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत . सुर्यकुमार यादवला रोहितचा उत्तराधिकारी बनवले.

               याच पार्श्वभूमीवर भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी टिम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या दोन्ही माजी दिग्गज खेळाडूंनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.  अजित आगरकरने बचावात्मक उत्तर देताना सांगितले की, हार्दिक पांड्याला त्याच्या फिटनेसच्या चिंतेमुळे काही काळ टि२० संघाचा कर्णधार बनवण्यात आलेले नाही.  त्याच्या जागी ही जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आली आहे. निसर्ग नियमानुसार संघ व्यवस्थापनाला एका खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती करायची असते जो बहुतांश सामन्यांसाठी उपलब्ध असेल. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्यावरही चर्चा झाली. रविंद्र जडेजाबाबत गंभीर म्हणाला की, त्याला श्रीलंका दौऱ्यातून वगळण्यात आलेले नाही, मात्र त्याला विश्रांती देण्यात आली आहे. यावेळी गंभीरने त्याच्या सपोर्ट स्टाफ विषयीही चर्चा केली. गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत काही महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा केली. त्याबाबतचा ऊहापोह प्रस्तुत लेखात थोडक्यात घेऊया. 

              निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनीही या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले की, “हार्दिक हा नेहमीच आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याच्यासारखे कौशल्य मिळवणे कठीण आहे. गेल्या काही काळापासून त्याच्या तंदुरुस्तीची समस्या आहे. आशा आहे की त्याची कामगिरी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे. आम्हाला असा खेळाडू हवा आहे.  बहुतेक प्रसंगी तो दुखापतीमुळे अनुपलब्ध होता. त्यामुळेच सूर्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. 

             प्रशिक्षक गौतम गंभीर, रोहित व विराट संदर्भात म्हणाला की, “मोठ्या मंचावर ते काय करू शकतात हे त्यांनी आख्ख्या जगाला दाखवून दिले आहे. या दोघांमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, तसेच त्यांनी फिटनेस राखला तर सन २०२७ चा विश्वचषकही खेळून जिंकून देऊ  शकतात. ते अजूनही जागतिक दर्जाचे आहेत आणि कोणत्याही संघाला ते दोघेही हवे आहेत.” विराट कोहलीसोबत यापूर्वी अनेकदा झालेल्या वादा संरदर्भात त्या दोघांच्या संबंधाबाबत पत्रकारांनी छेडले असता गौतम गंभीर म्हणाला, “टीआरपीसाठी हे खूप छान आहे, पण माझे त्याच्यासोबतचे नाते सार्वजनिक नाही. मैदानावर प्रत्येकजण संघासाठी लढेल. सध्या आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत. माझ्यात आणि त्याच्यात खूप चांगले नाते आहे.” त्याच्याशी बोलण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाला अभिमान वाटावा यासाठी आम्हा दोघांना खूप मेहनत करावी लागेल आणि ते पुढेही चालू राहील. रविंद्र जडेजाला वगळले की विश्रांती दिली?या प्रश्नाचे समजूतदारपणे उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला, “या छोट्या मालिकेसाठी त्याला आणि अक्षरला एकाच वेळी संघात घेणे योग्य ठरले नसते. दोघांपैकी कोणीही तिन्ही सामने खेळू शकले नसते. कसोटीचा मोठा हंगाम येत असल्याने तो मोठ्या प्रमाणात खेळण्यास तयार आहे. त्याला वगळण्यात आलेले नाहीत हे खूप महत्वाचे आहे.

               ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा यांसारख्या युवा खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर स्थान न मिळाल्यावर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले  “तुम्हाला पाहावे लागेल की त्यांच्या पुढे कोणाची निवड झाली आहे. या टप्प्यावर, आम्हाला झिम्बाब्वेमध्ये काही खेळाडूंना संधी देण्याची गरज होती. आमच्याकडे सखोलता आहे. रिंकूने कोणतीही चूक न करता टि२० विश्वचषक गमावला आहे. प्रत्येकाला पंधरा जणांच्या संघात निवडणे कठीण हे कठीण आहे.” अजित आगरकर म्हणाले, रिषभ पंत बराच काळ संघाबाहेर होता, त्यामुळे आम्ही त्याला कोणत्याही ओझ्याशिवाय परत आणू इच्छितो. प्रदिर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा कोणताही खेळाडू तुम्हाला हळूहळू संघात परत आणण्याची गरज आहे. के.एल. राहुल बाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, त्याला रीसेट बटण दाबावे लागेल.’ भारत भविष्यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या संघांसोबत खेळेल का ? या प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला, “या गोष्टी भविष्यात घडत राहतील. सध्या असे म्हणता येणार नाही की तीन वेगवेगळे संघ असतील. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या निवृत्तीमुळे टि२०मध्ये बदल होतील. जेवढे जास्त खेळाडू सर्व फॉरमॅटमध्ये खेळू शकतात, तेवढे चांगले.” अजित आगरकर म्हणाले, “तसेच तुमच्याकडे सर्व फॉरमॅटमध्ये खेळू शकणारे खेळाडू असतील तर खूप छान आहे.” गौतम गंभीरने सपोर्ट स्टाफवरून पडदा उचलला. गंभीरने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि रायन टॅन डोशेटे यांची नियुक्ती निश्चित केली आहे.  साईराज बहुतुले आणि टी दिलीप हे सपोर्ट स्टाफ म्हणून टीमसोबत श्रीलंकेला जाणार असल्याची माहितीही त्याने दिली.

              मोहम्मद शमी संघात कधी परतणार ? या प्रश्नावर अजित आगरकर म्हणाले, “मोहम्मद शमीने गोलंदाजी सुरू केली आहे, हे एक चांगले लक्षण आहे. बांगलादेशविरूध्द पहिली कसोटी १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. मला माहित नाही की त्याची रिकव्हरी टाइमलाइन काय आहे, याबद्दल एनसीएच्या लोकांना विचारावे लागेल. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा दृष्टिकोन काय असेल ? यावर गौतम गंभीर म्हणाला, नेहमी जिंकण्यासाठी खेळा, आम्ही निष्पक्ष खेळण्याचा प्रयत्न करतो, कठोर परिश्रम करतो आणि विजयासह ड्रेसिंग रूममध्ये परत येतो. गोष्टी गुंतागुंत करणार नाहीत. हा खेळाडू, सहाय्यकांचा संघ आहे.” खेळाडूंना खूश ठेवणे हेच सपोर्ट स्टाफचे काम आहे आणि तेच आम्ही करू.” अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आगरकर व गंभिरने पत्रकारांच्या प्रश्नांचा धिरोदात्तपणे सामना करत आपल्या सलामीवीराच्या लौकीकाप्रमाणे सांगोपांग उत्तरे देत श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाईटकडे प्रयाण केले.

डॉ.दत्ता विघावे,

क्रिकेट समिक्षक

COMMENTS