नेवासाफाटा/प्रतिनिधी ः तालुक्यातील महिलांसाठी न्यू साई मंगल ज्वेलर्सच्या वतीने प्रथमच तालुक्यातील महीलासाठी भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्य
नेवासाफाटा/प्रतिनिधी ः तालुक्यातील महिलांसाठी न्यू साई मंगल ज्वेलर्सच्या वतीने प्रथमच तालुक्यातील महीलासाठी भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 1 ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी नेवासा येथील मोहिनीराज मंगल कार्यालयात भव्य बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे अहमदनगर येथील प्रसिध्द डॉ. अंजली केवल ऋतुजा फाउंडेशनचे अध्यक्ष सुवर्णा जाधव, जिजाऊ फाऊंडेशनच्या अध्यक्ष गंगापूर मारूती राव घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पाटील, नेवासा नगरपंचायत अध्यक्ष सतिष पिंपळे, डॉ रवींद्र कानडे, निलेश कडू, साधना मुळे आदी उपस्थित होते. विजेत्यांना न्यु साई मंगल ज्वेलर्सच्या वतीने प्रथम पारितोषीक 2 ग्रॅम सोन्याची नथ, द्वितीय पारितोषिक 1 ग्रॅम सोन्याची नथ, तृतीय पारितोषिक चांदीचे 20 वीस ग्राम चांदीची दोन नाणेसह 150 उत्तेजनार्थ विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमप्रसंगी नेवासा शहरातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला मंडळी व ग्राहक रमाकांत सोनार राहुल सोनार अतुल सोनार संतोष आंबिलवादे सुनील आंबिलवादे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत सोनार यांनी केले तर आभार प्रतिक्षा सोनार यांनी मानले.
या महिला ठरल्या बक्षीसाच्या मानकरी- यावेळी प्रथम क्रमांक प्रज्ञा प्रवीण बोरूडे, द्वितीय क्रमांक मिनाक्षी आदिनाथ कूलकर्णी, तुतीय क्रमांक वंदना प्रवीण बोरकर, शोभा शिवाजी मोरे, या बक्षीसाच्या मानकरी ठरल्या.
प्रथमच तालुक्यातील महिलांसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते न्यू साई मंगल ज्वेलर्स कडून भरघोस बक्षीस यावेंळी देण्यात आली पुढील वर्षी देखील आणखी मोठ्या प्रमाणात आम्ही असाच कार्यक्रम घेऊ तमाम नेवासकर बंधूनी आम्हला भरघोष प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद
राहुल रमाकांत सोनार. न्यू साई मंगल ज्वेलर्स
COMMENTS