Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितला विधानसभेसाठी गॅस सिलिंडर चिन्ह

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध मतदारसंघात वेगवेगळे निवडणूकचिन्ह देण्यात आले होते. मात्र वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंब

स्पर्धात्मक भाव मुलांचे भविष्य घडवतो ः प्रफुल्ल खपके
पुणे मुंबई लेन एक्स्प्रेसवे वर भीषण अपघात.
सलमान खानकडून ‘धाकड’च्या ट्रेलरचं कौतुक | LokNews24

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी विविध मतदारसंघात वेगवेगळे निवडणूकचिन्ह देण्यात आले होते. मात्र वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकच चिन्ह देण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र काढून ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच भारतीय निवडणूक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात ’गॅस सिलिंडर’ चिन्ह दिल्याचे घोषित केले. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने ’गॅस सिलिंडर’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधासभा निवडणुकीत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलिंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर यंदा वंचित बहुजन आघाडीने 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा करत विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

COMMENTS