Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुजरातचा लसूण नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल 

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबई तील एपीएमसी बाजारात लसणाचे रेट होलसेल मध्ये किलोमागे 50 रुपयांच्या आसपास असून,आता असलेला लसूण हा गुजरात वरून

किटकनाशकांच्या सुरक्षित वापरासाठी सूचना
टोमॅटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
जकातवाडी-सोनगाव परिसरात बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबई तील एपीएमसी बाजारात लसणाचे रेट होलसेल मध्ये किलोमागे 50 रुपयांच्या आसपास असून,आता असलेला लसूण हा गुजरात वरून आलेला लसूण आहे. हा लसूण अजून 20 ते 25 दिवसच मर्यादित असल्याने पुढील महिन्यात मध्य प्रदेश,त्याचप्रमाणे उटी आणि अन्य ठिकाणाहून येणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.मात्र त्याला अजून एखादा महिना जाणार आहे. त्यामुळे आता असलेला गुजरातचा लसूण बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. त्याला 50 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे.मात्र यानंतर येणाऱ्या लसणाचे दर वाढणार असल्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.तर नवीन लासणाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीही असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS