Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई ःउल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यां

’इन्स्टाग्राम’वरून फसवणूक करणारी टोळी जेरबंद
काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी
पुंछमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

मुंबई ःउल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गणपत गायकवाड यांना बुधवारी सकाळी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना याआधी 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलिस कोठडी संपली. त्यानंतर आज न्यायालयाने सर्व पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

COMMENTS