Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंड नीलेश घायवळची रिल्स व्हायरल करून दहशत

पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांची केराची टोपली?

पुणे ः पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सलग दोन दिवस शहरातील कुख्यात गुंडांची ’परेड’ घेतली. यामध्ये आवश्यक

अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन
चित्ता प्रकल्प सुकाणू समितीची स्थापना
अपघाताचे वाढते प्रमाण…

पुणे ः पुणे शहर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार यांनी सलग दोन दिवस शहरातील कुख्यात गुंडांची ’परेड’ घेतली. यामध्ये आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी या गुन्हेगारांना केल्या होत्या. मात्र परेड झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच यातील काही गुन्हेगारांनी सोशल मीडियावर रिल्स टाकण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत गुंडगिरी सुरूच ठेवण्याचे संकेत यानिमित्त गुन्हेगारांनी दिले आहेत.
पुण्यात गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत असे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या आदेशानंतरही गुन्हेगारांकडून मुजोरी सुरूच आहे. पोलिसांनी गुंडांची परेडही काढली तरीही गुंड पोलिसांचे आदेश जुमानत नसल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेच त्यांनी शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली. पोलिस आयुक्तालयात शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम देखील देण्यात आला होता. गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडिओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर वायरल करायचे नाहीत असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश दिले होते. पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड नीलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर आले आहे. गुंड नीलेश घायवळ याचे मंत्रालय परिसरातील रिल्स व्हिडिओ, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर मोठी खळबळ माजली. पुणे पोलिसांनी नीलेश घायवळ याला त्याच्या गँगमधील गुन्हेगारांसह पुणे पोलिस आयुक्तालयात बोलावले. पुन्हा असे फोटो व्हायरल करायचे नाही, रेकॉर्ड करायचे नाही असा दम दिला होता.  

COMMENTS