Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अयोध्येसाठी गंगापूर-अयोध्या ‘परिवर्तन’ बस सेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रामनवमीच्या पा

अपारंपारिक ऊर्जा वापरास चालना द्यावी : अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर


छत्रपती संभाजीनगर
: प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर गंगापूर ते अयोध्या अशी थेट ‘परिवर्तन’ बस सेवा सुरू करण्याची तयारी पूर्णत्वाकडे जात असून, त्यामुळे भाविकांना सोयीस्कर व परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
या नव्या सेवेअंतर्गत गंगापूरहून अयोध्येला जाण्या-येण्यासाठी सुमारे 6 हजार 650 रुपये इतके भाडे निश्‍चित करण्यात आले आहे. खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत हे भाडे लक्षणीयरीत्या कमी असल्याने सर्वसामान्य भाविकांसाठी ही योजना दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या दरांमुळे आणि रेल्वे तिकिटांच्या टंचाईमुळे अनेकांना अयोध्येला जाणे कठीण होत होते. अशा परिस्थितीत राज्य परिवहनची ही सेवा एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहे.
महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीचा विचार करून आरक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासी आगाऊ नोंदणी करून आपला प्रवास नियोजित करू शकतील. रामनवमीच्या मुहूर्तावर बस सुरू करण्याचे नियोजन असले, तरी नेमकी प्रस्थान तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर देशभरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महाराष्ट्रातून जाणार्‍यांची संख्या विशेषतः वाढलेली दिसून येते. यामुळे थेट, सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज भासू लागली होती. गंगापूर-अयोध्या बस सेवा ही त्या गरजेची पूर्तता करणारी ठरणार आहे. या उपक्रमामुळे गंगापूर आणि परिसरातील रामभक्तांना आता अधिक सुलभतेने अयोध्येला जाता येणार असून, धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS