छ.संभाजीनगर ः महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झाला असून, महायुतीच्या काळात एकमेकांवर कुरघोडी करण्यातच राजकीय पक्ष धन्यता मानत असल्याचे दिसून
छ.संभाजीनगर ः महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झाला असून, महायुतीच्या काळात एकमेकांवर कुरघोडी करण्यातच राजकीय पक्ष धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात टोळीयुद्ध सुरू असल्याची बोचरी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. छत्रपती संभाजीनगर मध्ये परिवर्तन महाशक्ती या तिसर्या आघाडीत सहभागी सर्व पक्ष पदाधिकार्यांचा संयुक्त मेळावा गुरूवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा प्रश्न आता आम्हाला विचारला जात आहे. मात्र हाच प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले का? किंवा महायुतीतील नेत्यांनी तरी या प्रश्नाचे उत्तर दिले का? असा प्रति प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. परिवर्तन महाशक्तीमध्ये आम्ही सर्वच शोषित, वंचितांचे प्रश्न मांडणारे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारे कार्यकर्ते आहोत. या आघाडीतील सर्वच घटक हे नेते असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. परिवर्तन महाशक्ती मध्ये कोणी वंचितांचे प्रश्न मांडणारे आहे तर कोणी दलितांचे प्रश्न मांडणारे आहेत. कोणी महिलांसाठी काम करणारे आहेत तर कोणी युवकांसाठी काम करणारे आहेत. कोणी शेतकर्यांसाठी तर कोणी दिव्यांगांसाठी काम करणारे आहेत. या परिवर्तन महाशक्तीमध्ये सर्व समावेशक सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील समावेश असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. यावेळी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, लोक जातीपातीत गुंतवून ठेवले आहेत, एका एका मतदारसंघात 100 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. आम्ही छत्रपतीचे भक्त आहेत. ज्याने भाव दिला नाही त्यांना आमचे मत नाही. काँग्रेसला वाटते दलित मुस्लिम आमच्यासोबत आहे आणि भाजपला वाटते हिंदू आमच्यासोबत आहे, पण आमच्यासोबत शेतमजूर आहे. डोक्यात बदलाची आग आहे, आणि बदला घायचा आहे. आमच्यावर आरोप केले जातील, भाजपची बी टीम म्हटले जाईल असा दावा देखील कडून यांनी यावेळी केला.
देश खड्ड्यात घालण्याचे काम सत्ताधार्यांनी केले ः बच्चू कडू – प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला, पण त्याची शिफारस मान्य केली नाही. मग मोदी आले. पण त्यांनी देश खड्ड्यात घातला, असे ते म्हणालेत. ते म्हणाले, आजची सभा काँग्रेसवाल्यांचे कोथळे काढ्यासाठी आहे. ते ज्या गडावर भेटतील, त्या गडावर त्यांना मारू. या काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला, पण त्याची शिफारस मान्य केली नाही. त्यानंतर मोदी आले, पण त्यांनी देश खड्ड्यात घातला. आम्ही सतरंजी उचलणारे आहोत. पण आता ज्यांच्यासाठी सतरंज्या टाकल्या त्यांचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही.
COMMENTS