Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, कोयते जप्त

पुणे ः पुणे शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी खडकवासला भागातील एका हॉटेलवर दरोडा टाकून

डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवीदान
प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या
अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

पुणे ः पुणे शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी खडकवासला भागातील एका हॉटेलवर दरोडा टाकून रोकड लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे, कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
वैभव नारायण गौडी (वय 20, रा. इंगळेनगर, वारजे जकात नाका), ओम राजेश ओव्हाळ (वय 21, रा. साईलिला अपार्टमेंट, वारजे), हर्षल प्रदीप वरघडे (वय 20 रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर), स्वप्नील भगवान कांबळे (वय 19, रा. मावळे आळी, कर्वेनगर), महादेव श्रीरंग झाडे (वय 19), बालाजी उर्फ टप्या राजकुमार कांबळे (वय 18), ऋषीकेश किसन मेणे (वय 20, तिघे रा. कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलीस शिपाई दीपक कांबळे यांनी याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौडी,व्हावळ यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.खडकवासला भागातील मांडवी खुर्द गावातील एका हॉटेलवर आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शाखाली पथकाने सापळा लावून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, दोन काडतुसे, कोयता जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस कुरेवाड तपास करत आहेत.

COMMENTS