Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन

कोपरगाव तालुका ः एकीकडे डॉल्बी डिजेच्या आवाजात गणपती बाप्पाचे विसर्जन होत असतांना कोपरगाव तालुक्यातील शहाजापुर गावाने एकत्र येत एक अनोखा उपक्रम र

महापालिकेत मे अखेरपर्यंत होणार भरती
मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ
दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन मंजूर

कोपरगाव तालुका ः एकीकडे डॉल्बी डिजेच्या आवाजात गणपती बाप्पाचे विसर्जन होत असतांना कोपरगाव तालुक्यातील शहाजापुर गावाने एकत्र येत एक अनोखा उपक्रम राबवत एक वेगळा संदेश देत संपूर्ण गावकर्‍यांनी एकत्र येऊन आपल्या घरातील गणपतीला टाळ मृदुंग व अभंगाच्या गजरा मध्ये ग्राम प्रदक्षिणा करून विसर्जन केले आहे. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल यासाठी शहाजापूर गावातील गावकरी नेहमी अग्रेसर असतात प्रत्येक शनिवारी संपूर्ण गावकरी एकत्र येऊन ग्रामदैवत हनुमानाची आरती देखील करत असतात… संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवताचार्य कैवल्य महाराज जोशी यांनी केले. यावेळी गावचे पोलीस पाटील, इंद्रभान ढोमसे, दत्तात्रेय अवंतकर, अनिल देशमुख, विजू वाबळे व इतर गावकरी उपस्थित होते.

COMMENTS