Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशभक्तांनी माता भगिनींचा सन्मान करावा

हभप दिपक महाराज देशमुख यांचे आवाहन

अकोले ः मातेच्या रक्षणार्थ  गणपती बाप्पा यांचा अवतार म्हणून आपण सर्वांनी माता भगिनींना सन्मान व रक्षण करावे असे आवाहन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे वि

सैनिकाच्या व्यक्तीगत धर्मापेक्षा त्याचा सैनिकी धर्म मोठा : कमांडंट ब्रिगेडियर विजयसिंग राणा
अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न-बाळासाहेब थोरात
खासदार लंके यांचा शेवगावात संविधान देऊन सन्मान

अकोले ः मातेच्या रक्षणार्थ  गणपती बाप्पा यांचा अवतार म्हणून आपण सर्वांनी माता भगिनींना सन्मान व रक्षण करावे असे आवाहन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त व रोटरी  क्लब अकोलेचे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले. कळसेश्‍वर विद्यालय कळस बुद्रुक येथे गणेशोत्सवा निमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी हभप दिपक महाराज देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्याकिा नंदाताई शिवाजीराव बिबवे होत्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य व माजी अध्यक्ष सचिन शेटे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
गणपती बाप्पा हे बुध्दीची देवता आहे. समाजातील सर्वच लोकां सोबत देव,साधूसंत व ऋषी मुनींनी  गणपती बाप्पा यांना  वंदन केले आहे.आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-शांती आणण्यासाठी गणपती बाप्पा यांचे योगदान मोठे आहे. यावेळी बोलतांना दिपक महाराज देशमुख म्हणाले की – तुमच्या ओळखीने तुमचा परिवार व गाव ओळखले जाणार असेल तर त्याच्या इतका जीवनात दुसरा आनंद नाही.जन्माने माणूस श्रीमंत होत असला तरी कर्माने माणूस मोठा होत असतो. स्व.धीरूभाई अंबानी यांनी सुरुवातीच्या काळात पेट्रोल पंपावर काम केले..आजही ते युवा  उद्योजकांचे आदर्श आहेत.जगात सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचे नाव होते. स्वकर्तुत्वाने ते पुढे आले.

आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या पेक्षा आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे असे शिक्षकांना नेहमी वाटत असते.त्यासाठी आपण सर्वांनी खूप अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे, जीवनात फक्त उच्च पदावर गेल्यावर आपले आई, वडील, शाळा, गुरुजन यांना विसरू नका, त्यांच्या बद्दल आयुष्यभर कृतज्ञता ठेवा, टि.व्ही. व मोबाईलपासून दूर रहा, ज्यावेळेला जे करायचे ते केले, स्वतःला सिद्ध  केले तर भविष्यात आपली अपॉइनमेंट घ्यावी लागेल अशी कृती करून दाखवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रास्ताविक व स्वागत मच्छिंद्र साळुंखे यांनी केले. तर आभार शिवाजी आवारी यांनी मानले. यावेळी शिक्षक केशव महाले, गीतांजली खरबस, मनिषा शिंदे, कुमार पालवे,सुरेश  वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.

COMMENTS