Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश रेवगडे

अकोले प्रतिनिधी - स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी अकोले तालुक्यातील कळस खुर्द सोसायटीचे सचिव गणेश रेवगडे यांची निवड झाली आहे. नगर येथे झाले

रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालिका दिनाचे नेत्रदीपक साजरीकरण
भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी
राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जनता दरबार ठरतोय चर्चेचा विषय…

अकोले प्रतिनिधी – स्वाभिमानी सचिव संघटनेच्या अध्यक्षपदी अकोले तालुक्यातील कळस खुर्द सोसायटीचे सचिव गणेश रेवगडे यांची निवड झाली आहे. नगर येथे झालेले बैठकीत नवीन निवडी जाहीर केले आहेत. अध्यक्ष गणेश रेवगडे, अकोले, उपाध्यक्ष भिवा कवडे कर्जत, सरचिटणीस रावसाहेब सोनार नगर, खजिनदार मंगेश देशमुख पारनेर यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. सेवा सोसायटीच्या संस्था नियुक्त सचिवांच्या विविध अडचणी व विविध समस्या लक्षात घेता संघटनेचे कार्य हे लक्षवेधी असणार आहे.


शेतकर्‍यांची कामधेनु म्हणुन काम करणार्‍या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिव संघटनेच्या प्रथम नुतन कार्यकारिणी अंमलात आली आहे. सचिवांच्या विविध मागण्या प्रशासनापर्यत पोहचवने तसेच संस्था नियुक्त सचिव यांना जिल्हास्तरीय समितीमध्ये वर्ग करणे व विविध मागण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संस्था नियुक्त सचिवांनी एकत्र येत नगर येथे सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेवा सोसायटी जिल्ह्यातील सर्व सचिवांनी संघटनेची महत्वाची जबाबदारी व सन्मान अकोले तालुक्याला दिल्याने अभिनंदन होत आहे.  रेवगडे यांच्या या निवडी बद्दल जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संगमनेर कारखान्याचे माजी संचालक सिताराम वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, जयकिसान दुध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, ह.भ.प गणेश महाराज वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, कळस सोसायटी संचालक डि.टी.वाकचौरे, निवृत्ती मोहीते, प्रकाश आल्हाट, सूर्यकांत ढगे, ग्रामपंचायत सदस्य जिजाबा वाकचौरे, कळसेश्‍वर देवस्थान ट्रस्ट सदस्य सुनील ढगे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ईश्‍वर वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, सेवा अर्थमुव्हर्स चे संचालक नंदु वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS