शिर्डी/प्रतिनिधी ः गणेश परिसराची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणार्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झा
शिर्डी/प्रतिनिधी ः गणेश परिसराची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणार्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार होणार्या निवडणूक प्रक्रियेप्रमाणे निवडणुकीसाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे, तर 17 जून रोजी मतदान होणार आहे. राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात यांचे पॅनलमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढत होईल असे सध्याचे निवडणूक पूर्व राजकीय चित्र दिसून येत आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र 15 ते 19 मे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्यांचे कार्यालयात दाखल करण्या साठी मुदत आहे तसेच दाखल उमेदवारी अर्जांची दि 22 मे रोजी सकाळी 11 वाजेनंतर छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर वैध उमेदवारी अर्जांची सूची दि 23 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे दि 23 मे ते 6 जून पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे त्यानंतर दि 7 जून रोजी सकाळी 11 वाजेनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे तदनंतर 17 जून 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे दि 19 जून रोजी सकाळी 9 वाजता निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केलेल्या स्थळी मतमोजणी होणार आहे सध्या कारखाना महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रवरा उद्योग समूहा कडून चालवला जात आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणार्या आजी-माजी महसूल मंत्री अर्थात सहकारातील नेत्यांचे पॅनल एकमेका विरोधात उभे ठाकणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी 19 जागा निवडून द्यायच्या आहेत सर्वसाधारण मतदारसंघातून शिर्डी 2, राहाता 3, वाकडी 3, पुणतांबा 2, याप्रमाणे 13 जागा निवडून द्यावयाच्या आहेत तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादित संस्था व पणन संस्था सभासदां मधून 1, जागा अनु-जाती/अनु जमाती 1 जागा, महिला प्रतिनिधी 2 जागा इतर मागासवर्ग 1 एक जागा, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रतिनिधी 1 अशा मिळून एकूण 19 जागा निवडून द्यायच्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय बैठकां वाढणार आहे.
COMMENTS