Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुगार अड्डयावर छापा साडे सात लाखाच्या मुद्देमालासह 24 ताब्यात

एलसीबी ची कोठला येथे कारवाई

अहमदनगर : विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  छापा टाकला. या कारवाईत 7 लाख 36 हजार 640 रु

नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले
अहमदनगरमध्ये क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं
भाळवणी परिसरात ’द बर्निंग कारचा’ थरार

अहमदनगर : विनापरवाना बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  छापा टाकला. या कारवाईत 7 लाख 36 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 24 जुगारी ताब्यात घेतले. ही कारवाई कोठला येथे केली. या बाबतची माहिती अशी की पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक दिनेश आहेर,हे जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, हॉटेल कुरेशीचे पाठीमागे असलेल्या बंदिस्त रुममध्ये वेगवेगळे तीन डाव गोलाकार करुन काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास  कारवाई करणे करिता रवाना केले.

पथकाने लागलीच त्या ठिकाणी जावुन खात्री करता काही इसम दोन खोलीत गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेवुन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला व तेथे बसलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता बसलेल्या इसमांनी त्यांची नावे गफार वजीर शेख (रा.अलमीन ग्राऊंड शेजारी मुकूंदनगर अ.नगर,) राजू मेहबुब शेख (रा. प्रेमदान हाडको अ.नगर) संभाजी महादेव निस्ताने (रा.सर्जेपुरा अ.नगर ) ऍ़गस्टीन जॉर्ज गोनसालविस (रा.तारकपुर अ.नगर) इमाम इब्राहिम पठाण (रा. नेप्तीरोड केडगाव अ.नगर ) बाळासाहेब सुभाष खटके (रा.कायनेटीक चौक अ.नगर) किरण प्रभाकर पानपाटील (रा.सदर बाजार भिंगार अ.नगर ) बाळासाहेब एकनाथ चेंडवाल (रा.गुंजाळी ता. राहुरी) किरण भगतराम बहुगूणा (रा.फलटण चौकी जवळ कोठला अ.नगर) बालाजी कृष्णहरी बिजा (रा.सावेडी अ.नगर) अरबाज खलील शेख (रा. कोठला अ.नगर) सुल्तान हनिफ शेख (रा.कोठला अ.नगर) जिशान राजू इनामदार (रा.मुकूंदनगर अ.नगर,) निसार अजिज शेख (रा.इदगाह मैदान ता. शेवगांव) जाहिद रऊफ सय्यद (रा.कोठला अ.नगर) राहुल रंगनाथ आल्हाट (रा. पिंपळगांव उजैन ता.नगर) छबुराव बाबुराव येळवंडे (रा. घोडेगांव ता.नेवासा) अनिल नारायण फुलारी (रा. दर्गादायरा मुकूंदनगर अ.नगर) तबरेज इसाक शेख (रा. दर्गादायरा मुकूंदनगर अ.नगर ) रफिक गुलाब शेख (रा.दर्गादायरा मुकूंदनगर अ.नगर) अख्तर जानमहंमद शेख (रा. बाबाबंगाली झेंडीगेट अ.नगर) इस्माईल हसन पठाण (रा.गजराजनगर बु-हाणनगर अ.नगर) अर्शद आयुब शेख (रा.मुकूंदनगर अ.नगर,) शुभम विजय देवळालीकर (रा. कराचीवाला नगर, अ.नगर) असे सांगितले.

ताब्यातील इसमांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 7 लाख 36 हजार 640 रुपये किंमतीची रोख रक्कम, एक स्कॉर्पिओ गाडी, विविध प्रकारचे 19 मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल मिळुन आला 

या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 27 आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग अनिल कातकडे. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

COMMENTS