Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गजाआड

पुणे ः मुंढवा पोलिस ठाण्याचे हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन मागील दोन महिन्यापासून फरार झालेल्या खुनाचे प्रयत्नातील आरोपीस जेरबंद क

Dharur : बिअर शॉपी व्यावसायिकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद (Video)
मळगंगादेवीच्या पालखी मिरवणूकीचे जल्लोषात स्वागत
नक्षलग्रस्त भागातील युवकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने आणले शिक्षणाच्या प्रवाहात

पुणे ः मुंढवा पोलिस ठाण्याचे हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन मागील दोन महिन्यापासून फरार झालेल्या खुनाचे प्रयत्नातील आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनुप ढगे (वय-23, रा.केशवनगर,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुप ढगे हा खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यापासून मागील दोन महिन्यापासून स्वत:चे अस्तित्व लपवून फिरत होता. मुंढवा पोलिस हद्दीत गस्त घालत असताना, तपास पथकातील पोलिस हवालदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की, आरोपी अनुप ढगे हा उरळीकांचन,पुणे येथे आहे. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप जोरे यांचे पथकाने संबंधित जागी पोलिस पथकासह जाऊन आरोपीचा शोध घेत त्यास पीएमटी बसस्थानक जवळ अटक केली आहे. सदरची कारवाई सपोनि संदिप जोरे, पोहवा दिनेश राणे, महेश पाठक, संतोष काळे, दिनेश भांदुर्गे, स्वप्नील रासकर, संतोष जगताप, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांचे पथकाने केली आहे.

COMMENTS